Shravan 2024: श्रावणात उपवासाला 'या' पदार्थांचा आहारात समावेश नक्की करा

Jul 23,2024


ऊन आणि पावसाचा खेळ म्हणजे श्रावण. याशिवाय श्रावण ओळखला जातो ते व्रत वैकल्यांसाठी.


श्रावणातील सोमवारी महादेवाची उपासना केली जाते. यंदा श्रावण हा 5 ऑगस्टपासून सुरु होत आहे.


श्रावणातील सोमवारी अनेक जणांचा उपवास असतो. या उपवासाला काय खावं हे जाणून घेऊयात.

बिया आणि नट्स

उपवासाला तुम्ही बिया आणि नट्स खाऊ शकता. मुठभर बिया, नट्स आणि काजू खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. नट्समुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.

साबुदाणा

उपवासाला साबुदाण्याची खिचडी किंवा वडे करुन खाल्ले जातात. साबुदाण्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते. मात्र काही जणांना साबुदाणा आणि शेंगदाण्यामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास होतो.


साबुदाणा आणि शेंगदाण्यामुळे पित्ताचा त्रास देखील होतो त्यामुळे उपवासाला साबुदाणा प्रमाणातच खावा असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.

दूध

दुधाला पुर्णअन्न म्हटलं जातं. जर तुम्ही श्रावणात उपवास करत असाल तर तुम्ही दिवसातून दोनदा दूध प्यासला हवं. दूधामुळे कामाचा थकवा दूर होतो.

फळं

केळी, सफरचंद, डाळिंब यांसारख्या फळांमध्ये जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी फळं खाल्याने पचनसंस्थेचं कार्य सुधारतं.

रताळे

रताळे खाल्याने मुबलक प्रथिने मिळतात. श्रावणात रताळे उकडून खाल्याने रोगप्रतिराक शक्ती वाढते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story