'या' डाळीचं पाणी आरोग्यासाठी वरदान; वजन कमी करण्यातही होते मदत
डाळ तर आपण नेहमीच खातो. पण, एखाद्या डाळीवर येणारं पाणी आरोग्यासाठी किती लाभदायक असतं तुम्हाला माहितीये?
डाळ कायमच डिटॉक्सिफाईंग एजंट म्हणून काम करते आणि शरीरातील नको असणाऱ्या घटकांच्या उत्सर्जनासाठी त्याची मोठी मदत होते. डाळीच्या पाण्यामध्ये तंतूमय घटक असल्यामुळं पचनक्रिया सुरळीत होते.
तुम्हाला माहितीये का, मुगाच्या सालभरल्या डाळीचं किंवा साध्या मुगाच्या डाळीचं पाणी पिण्याची वजन कमी करण्यात मोठी मदत होते. यामुळं फॅट मेटाबॉलिजम उत्तम काम करतं.
आतड्यांची अन्न पचवण्याची क्षमता वाढते आणि अधिक प्रभावी काम करु लागते, ज्यामुळं शरीरातील चरबीचं प्रमाणही कमी होतं. डाळीचं पाणी प्यायल्यानं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
अती सेवनाचं प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठीसुद्धा डाळीचं पाणी पिणं फायद्याचं असतं. यामध्ये असणारे तंतूमय घटक पोट भरतात आणि त्यामुळं पदार्थांचं अती सेवन टळतं. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे देण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. )