बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
वजन वाढणं किंवा कमी होणं,अॅर्लजी,चेहऱ्यावर पिंपल्स-डाग येणं ही आता समस्या सामान्य झालीय.
खास करुन थंडीच्या दिवसात त्वचा फुटणं, कोरडी पडणं, खरखरीत होण्याचा त्रास होतो.
थंडीच्या दिवसांत आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये जर हे घरगुती ऊपाय केलेत तर त्वचेच्या समस्या दूर होऊन त्वचा नैसर्गिकरीत्या उजळू शकते.
रोजच्या वापरातील कितीतरी गोष्टी अशा असतात, ज्यांचा आयुर्वेदिक औषधांत मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो.
त्यातीलच हळद, बेसन, मध आणि लिंबाचा रस
हळद, बेसन, मध आणि लिंबाचा रस एकत्र घेऊन त्याची पेस्ट करा.
ही पेस्ट चेहऱ्यावर ३० मिनिटं लावून नंतर चेहरा थंड किंवा कोमट पाण्याने धुऊन घ्या.
हळदीत अँटी-सेप्टिक, अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम व डागांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
आठवड्यातून दोन वेळा केल्यानं थंडीच्या दिवसांत चेहऱ्याच्या समस्या होणार नाहीत.