पुदिना हे औषधी वनस्पती असल्यामुळे त्याचा सेवनामुळे आपल्या अनेक फायदे मिळतात. त्याशिवाय पदार्थाची चव वाढविण्यासोबत पुदिनाच्या सुगंधामुळे याचा वापर अनेक ठिकाणी होतो.
पुदिनाच्या पानांत व्हिटॅमिन ए आणि सी हे कॅल्शियम असतात ज्यामुळे निरोगी दृष्टी वाढते. चहामध्ये पुदिना टाकून प्यायल्याने मन शांत होतं राहतं.
पुदानाचा चहा प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. पुदिना जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला त्रास होतो.
काही लोकांना पुदिनांच्या पानांची ऍलर्जी असते. या ऍलर्जीमुळे त्वचेची जळजळ, खाज सुटणं, लालसरपणा येणं असे गंभीर लक्षणे शरीरावर दिसून येतात.
पुदिनाचा चहा रोज प्यायल्याने किडनी खराब होण्याची भीती असते आणि यकृतचा आजार बळवण्याची शक्यता असते.
पदिना जास्त खाल्ल्याने मधुमेहाची पातळी कमी होते, असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
जर तुम्ही गर्भवती असाल तर किंवा स्तनपान करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुदिनाचे सेवन करावं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)