Belly Fat loss: चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे सध्या लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. आजकाल तरूणांमध्येही ही समस्या दिसून येतेय.
आज आम्ही तुम्हाला जास्त मेहनत न करताही Belly Fat कसं कमी करू शकता, याची माहिती देणार आहोत.
तुमच्या दररोजच्या जीवनात तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत.
कॅफेनचं अधिक सेवन हानिकारक असलं तरी, काही अभ्यासातून कॅफेन पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं, असं समोर आलंय.
बेली फॅट मुक्त होण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिसळून सेवन करणं फायदेशीर ठरू शकते.
दिवसभरात भरपूर पाणी पिण्याची सवय तुमच्यासाठी फायदेशीर मानली जाते.
शरीराचं एकूण वजन किंवा पोटावरील चरबी कमी करायची असेल तर भरपूर पाणी पिण्याची सवय लावणं फायदेशीर ठरतं.