थंडीत आपल्याला आरोग्याची काळजी घ्यायला हवी. पण या काळात झोपण्याच्या वेळा बदललेल्या दिसतात.
थंडीत सकाळी उठायला सर्वजण कंटाळा करतात.
अशावेळी झोपण्या-उठण्याची योग्य वेळ कोणती? असा प्रश्न उपस्थित होतो.
थंडीत झोपण्या, उठण्याची वेळ कोणती? आरोग्यावर कसा परिणाम होतो? यावर तज्ञांनी माहिती दिली आहे.
किती वाजता झोपायचं? किती वाजता उठायला हवं याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
प्रत्येक व्यक्तीला किमान 7 तासांची झोप हवी. थंडीतही 7 ते 8 तास झोप घ्यावी.
रोज रात्री 10 ते 11 वाजता झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
हिवाळ्यात रोज 6 ते 7 वाजता उठण्याची सवय लावावी. यामुळे तुम्हाला व्यायाम करायलाही वेळ मिळेल.
सकाळी लवकर उठल्यास नाश्ताही वेळेवर होईल आणि जेवणावेळी भूक लागेल. डिनरदेखील वेळेवर होईल. आजारी पडण्याची वेळ येणार नाही.
असे केल्याल रोज झोपही पूर्ण होईल आणि स्लीपिंग सायकलही पूर्ण होईल.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)