दात दुखीपेक्षा दुसरं कोणतचं दुखण मोठं नाही असे दातदुखीने त्रस्त असलेल्यांना वाटते.
प्रामुख्याने दात किडल्यामुळे दात दुखीचा त्रास होतो.
किडलेला दात वाचवण्यासाठी डेंटिस्ट रुट कॅनल करण्याचा सल्ला देतात.
रुट कॅनल या उपचार पद्धतीत किडलेल्या दातामधील किड मुळापर्यंत पोखरुन काढली जाते.
रुट कॅनल केल्यानंतर त्या दातावर कॅप बसवणे गरजचे असते.
रुट कॅनल केल्यानंतर ट्रीटमेंट झालेल्या दातावर कॅप बसवली नाही तर ही चूक त्रासदायक ठरू शकते
कॅप न बवल्याने रुट कॅनेल केलेले निघून जाते. यामुळे दात सेंसेटिव्ह होऊन तीव्र वेदना होवू शकतात.