अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 43 व्या वर्षीही तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.
'हम तुम अॅण्ड देम'मधील भूमिकासाठी श्वेताने तिचा वजन कमी करण्याचा प्रवास सुरु केला, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.
दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर श्वेताने तिचं वजन 73 किलोपर्यंत कमी केलं.
सातत्याने शुटींग असल्याने श्वेताला नियमितपणे जीमला जाता येत नव्हतं.
त्यामुळेच श्वेताने डाएटच्या मदतीने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. तिने आहारतज्ज्ञ किनिता काडाकिया पटेल यांच्या मदतीने 10 किलो वजन कमी केलं.
कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स युक्त डाएट हे श्वेताच्या सुडौल शरीराचं रहस्य आहे.
श्वेता भरपूर पाणी पिते. त्यामुळेच तिला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
श्वेताच्या जेवणामध्ये कायम तूप कायम असतं. तसेच हाय फायहर जेवणाला ती प्राधान्य देते.
वजन कमी झाल्यानंतर श्वेताचा आत्मविश्वास वाढला. तिने आपल्या व्यायामामध्ये वेटलिफ्टींग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश खेला.
श्वेताने 'खतरो के खिलाडी'साठी तयारी करण्याच्या दृष्टीने आपलं रुटीन अधिक व्यायाम केंद्रित केलं.
वजन कमी करणं हे फार आव्हानात्मक असतं असं श्वेताचं म्हणणं आहे.
वजन कमी करण्यासाठी डेडिकेशन, स्वयंशिस्त आणि इच्छाशक्तीची गरज असते, असं श्वेताचं म्हणणं आहे.
मात्र योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा असेल तर वजन कमी करण्याचा प्रवास अधिक मनोरंजक होतो, असं श्वेताने सांगितलं.
वजन कमी केल्यानंतर श्वेता नियमितपणे फोटोशूट करुन ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करु लागली.
अगदी बोल्ड लूक्सपासून ते बिकीनी बॉडीपर्यंत वाढत्या वयामध्येही वजन कसं मेन्टेंन ठेवावं यासाठी श्वेताचा आदर्श घ्यावा असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
श्वेताने स्वत:मध्ये घडवलेला बदल पाहून तिच्या मित्रमैत्रिणींबरोबरच चाहत्यांनाही धक्काच बसला. अनेकजण तिचं यासाठी तोंडभरुन कौतुक करतात.
श्वेताचा हा वजन कमी करण्याचा प्रवास केवळ सुंदर दिसण्यासाठी नव्हता.
श्वेताने व्यायामाचा आधार तिच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे घेतला. ती अधिक सुदृढ होण्यासाठी व्यायाम करु लागली.
अर्थात श्वेताप्रमाणे सुडौल बांधा आणि वय लपवता येईल असा लूक हवा असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच काय तो निर्णय घ्या.