उन्हाळ्यात अनेकजण मोठ्या प्रमाणात ताक पितात. मात्र, ताक प्यायल्याने आरोग्य धोक्यात येवू शकते.
सर्दी, कफ आणि ज्यांना धुळीच्या कणांची अॅलर्जी आहे त्यांनी ताक पिऊच नये. किडनीशी संबंधित समस्या असतील तर ताक पिणे टाळावे.
जादा प्रमाणात ताकाचे सेवन केल्यास हृदयरोग (Heart Diseases) असलेल्या व्यक्तींच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढू शकते.
सांधेदुखी, आर्थ्रायटिस किंवा स्नायूंमध्ये वेदना असलेल्या शक्यतो ताक पिऊच नये.
अपचन झाले असल्यास जास्त आंबट असलेले ताक पिणे टाळावे.
ताकात कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 12 आणि मिनरल्स हे घटक असतात. ताक शरीरातील पाण्याची कमी दूर करते.