मुलांना दूध-बिस्कीट खायला देताय का? आताच थांबवा ही सवय
अनेक घरांमध्ये तुम्ही पाहिलं, असेल की आई तिच्या मुलांना दूध - बिस्कीट खायला देते. काही मुलांचं हे आवडीचं खाद्य.
एक बाब कायम लक्षात ठेवा, की दुधात बिस्कीट मिसळून खाल्ल्यानं मुलांच्या शरीराला त्याचा फारसा फायदा होत नाही. इथं पोषक तत्त्वांचा विषयच नसतो.
तज्ज्ञांच्या मते दुधात बिस्कीट मिसळून खाल्ल्यास त्यातून एकही पोषक तत्वं शरीराला मिळत नाही. उलटपक्षी त्याचे वाईट परिणामच जास्त होतात.
दुध आणि बिस्कीट एकत्र करून खाल्ल्यास शरीरात Carbogydrates चं प्रमाण झपाट्यानं वाढतं. ज्याचे नकारात्मक परिणाम दिसून येऊ लागतात.
बिस्कीटांमध्ये असणारा मैदा मुलांच्या पोटात जाऊन तो आतड्यांना चिकटण्याची शक्यता असते. ज्यामुळं त्यांना दिल्या जाणाऱ्या पोषक तत्त्वांच्या पुरवठ्यात अडथळा येतो.
बिस्कीट तयार करताना त्यात मैदा, साखर आणि कृत्रिम घटक मिसळले जातात. यामध्ये फायबरचंही प्रमाण कमी असतं. ज्यामुळं अपचनाचा त्रास सतावतो.
बिस्कीटामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळं मुलांना वारंवार भूक लागते. अनेकदा काही मुलांना बिस्कीटांमुळं अॅलर्जीही होते. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारलेली असून, झी 24 तास याची खाजरजमा करत नाही.)