अंतराळवीर अंतराळात असताना खातात तरी काय? Menu मधील पदार्थ पाहून व्हाल आश्चर्यचकित

Swapnil Ghangale
Aug 29,2024

सुनिता अडकून पडली

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बेरी विलमोअर स्पेस स्टेशनवर अडकून पडले असून ते आता थेट पुढल्या वर्षी पृथ्वीवर परत येतील असं नासाने म्हटलं आहे.

खाणार काय?

मात्र आता आठ दिवसांचा मुक्काम आठ महिन्यांवर गेल्याने सुनिता तिथे राहणार कशी? खाणार काय यासारखे प्रश्न अनेकांना पडलेत. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात की अंतराळवीर अंतराळात नेमकं खातात तरी काय...

मुक्काम नेमका असतो कुठे?

अंतराळवीर हे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर वास्तव्यास असतात. तिथे या अंतराळवीरांचा मोहिम संपेपर्यंत मुक्काम असतो.

स्पेस स्टेशनमध्ये काय खातात?

काधी काही महिने तर कधी काही आठवड्यांच्या या मुक्कामादरम्यान अंतराळवीर नेमकं या स्पेस स्टेशनमध्ये काय काय खातात हा फारच औत्सुक्याचा विषय आहे.

तीन वेळा जेवतात

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील अंतराळवीर दिवसून तीन वेळा जेवतात. यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असतो.

भाज्या आणि फळं खातात

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील अंतराळवीर रोज ताज्या भाज्या आणि फळं खातात. या गोष्टी इथे विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने अगदी डीप फ्रिज करुन ठेवलेल्या असतात.

रेडिएशनच्या मदतीने...

इथे दुग्धजन्य पदार्थांबरोबरच मांसाहारी पदार्थही अंतराळवीरांना खाण्यासाठी उपलब्ध असतात. यावर रेडिएशनच्या मदतीने विशेष प्रक्रिया करुन ते सडणार किंवा खराब होणार नाहीत याची काळजी घेतली जाते.

रेडी टू इट पदार्थ

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ज्या पदार्थांमध्ये पाण्याचा अंश कमी आहे असे पदार्थ खाण्याच्या काही मिनिटं आधी रेडी टू इट पद्धतीने गरम करुन खाल्ले जातात.

चॉकलेटही मिळतं

अंतराळवीरांना बेदाणे, चॉकलेट यासारख्या गोष्टीही रेडी टू इट पद्धतीने खाण्यासाठी उपलब्ध असतात.

पाण्याचा अंश काढून टाकतात

अंतराळामध्ये रिहायड्रेटेड फूडही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. या पदार्थांमधील पाण्याचा अंश पूर्णपणे काढून घेतला जातो. गरजेनुसार हे रिहायड्रेटेड फूड वापरलं जातं.

रिहायड्रेटेड पदार्थ वापरतात कसे?

जेव्हा रिहायड्रेटेड पदार्थ खायचे असतात तेव्हा पुन्हा त्यात पाणी टाकलं की ते आधीसारखे होतात आणि त्यांचं सेवन करता येतं.

VIEW ALL

Read Next Story