शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असले पाहिजे. हे लोहापासून बनलेले आहे आणि लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते.
त्याची कमतरता विविध रोगांना कारणीभूत ठरू शकते. आहारामध्ये 'या' पोषक गोष्टींचा समावेश करा
आपल्या आहारात फिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे गरजेचे आहे. कारण हिरव्या पालेभाज्या आरोग्यास लाभदायी असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे हिमोग्लोबिनवर मात करण्यासाठी पालेभाज्या उपयुक्त ठरतात.
शेंगदाणे खाणे आरोग्यास लाभदायी असते. शेंगदाण्यामदध्ये लोह , प्रथिने , फायबर , आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. हिमोग्लोबिन वाढविण्याकरिता डाळींम , सोयबिन आणि वाटाणा यांचे आहारात नियमितपणे सेवन करावे.
नियमितपणे खजूर, अक्रोड बदाम आणि मनुका यासारखे सुकामेवे खाल्यास हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत मिळते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. यामुळे शरीरातील रक्त वाढविण्यास मदत करू शकते.
सीफूड अनेकांची आवडती डिश आहे. यामध्ये लोह या धाटकाचे प्रमाण अधिक असते. कोळंबी, सुरमई , बांगडा या माशांचा आहारात सेवन करावे. ज्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळून हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते.
बरेच लोक आपल्या आहारात निटचा समावेश करतात. बीटचा आपण ज्यूस किंवा कोशिंबीरच्या स्वरूपात सेवन करू शकतो. बीट शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यास मदत करते. नियमित बिटचे सेवन करणाऱ्यांना हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत नाही.