दररोज व्हिटॅमिन बी12च्या गोळ्या घेतल्यास गंभीर नुकसान होऊ शकते!

Jul 12,2024

व्हिटॅमिन बी12

शरीरात सर्व पोषक तत्वांचे प्रमाण योग्य असणे फार महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी12 हे हाडे मजबूत करण्यासाठी आणि मेंदूच्या फायद्यासाठी आवश्यक आहे.

व्हिटॅमिन बी12 समस्या

शरीरात व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे मेंदूशी संबंधित समस्या, रक्ताची कमतरता आणि अशक्तपणा येऊ शकतो.

व्हिटॅमिन बी12 कमतरता

व्हिटॅमिन बी12 ची कमतरता आहाराद्वारे भरून काढली जाऊ शकते. याशिवाय अनेक लोक व्हिटॅमिन बी12 च्या गोळ्याही घेतात

व्हिटॅमिन बी12 गोळ्या

व्हिटॅमिन बी12 च्या गोळ्या ठराविक वेळेसाठीच घ्याव्यात. दररोज खाल्ल्याने त्यामुळं आरोग्याच्या अनेक समस्या होऊ शकतात.

खराब पाचन प्रणाली

दररोज व्हिटॅमिन बी12 च्या गोळ्या खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि उलटीसारख्या समस्या होऊ शकतात. याकडे दुर्लक्ष करू नये.

त्वचेशी संबंधित समस्या

दररोज व्हिटॅमिन बी12 च्या गोळ्या घेतल्याने त्वचेवर लालसर फोड येऊ शकतात.

रक्तदाब

व्हिटॅमिन बी12 च्या गोळ्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तदाब आणि हृदयासंबंधित आरोग्य धोक्यात येऊ शकते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story