हिवाळ्यात अनेकांना शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाणे हे भूक भागविण्याशिवाय आरोग्यासाठीही त्याचे फायदे आहेत. पण या 5 लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नयेत. फायद्याऐवजी आरोग्याला मोठं नुकसान होतं.
ज्या लोकांना अॅसिडिटीची समस्या आहे त्यांनी शेंगदाणे खाणे टाळा. शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते आणि अॅसिडिटीची समस्या अधिक वाढते.
ज्या लोकांना संधिवाताचा त्रास असेल त्यांनी शेंगदाणे चुकूनही खाऊ नये. शेंगदाण्यातील लेक्टिनमुळे वेदना आणि सूज वाढते.
ज्यांचे वजन जास्त आहे आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही शेंगदाणे खाऊ नका. कारण शेंगदाण्यात भरपूर कॅलरीज आणि फॅट असतं. ज्यामुळे तुमचं वजन वाढतं.
शेंगदाण्याचे अतिसेवन उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी घातक आहे. शेंगदाण्यातील भरपूर सोडियममुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जीची समस्या असेल तर तुम्ही शेंगदाणे खाणं टाळा. शेंगदाणे खाल्ल्याने खाज सुटणे, सूज येणे, मळमळ होणे, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास तुम्हाला होऊ शकतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)