डोळ्यांना शांतता आणि आराम मिळण्यासाठी रुमाल किंवा स्वच्छ कपडा थंड पाण्यात भिजवून त्याची घडी डोळ्यांवर किमान पंधरा मिनिटे ठेवाव. त्यामुळे आराम मिळतो.

Apr 22,2023


डोळ्यांना आराम मिळण्यासाठी दिवसातून ठराविक वेळेने थंड पाणी मारावे. यामुळे डोळ्यातून धुलीकण आणि घाण निघून जाते आणि डोळ्यांना आराम मिळतो.


डोळ्यांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी नौसर्गिक कोरफड चांगली. कोरफडचा गर काढून तो डोळ्यांना लावाला. यामुळे डोळ्यांची आग आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. थंडावाही मिळतो.


डोळ्यांचा थवा आणि डोळ्यातून सातत्याने पाणी येत असेल तर कच्चा बटाटा कापून त्याचे काप डोळ्यावर ठेवा. त्याआधी तो फ्रिजमध्ये ठेवून तो डोळ्यावर ठेवावा, आराम मिळतो.


डोळ्यांची आग होत असेल तर गार दूधही बेस्ट. कापूस दुधात भिजवून तो काहीवेळ डोळ्यांवर ठेवावा. थोड्यावेळाने डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. त्यामुळे जळजळ कमी होईल.


उन्हाचा त्रास होत असल्यास आणि डोळ्यांची जळजळ होत असल्यास गुलाबपाणी चांगले. गुलाबपाण्यात कापूस भिजवून तो जवळपास वीस मिनिटे डोळ्यांवर ठेवावा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.


उन्हाळ्यामुळे डोळ्यांची जळजळ होत असेल तर काकडीचा उपाय चांगला आहे. काकडीत नैसर्गिकरित्या थंडावा असतो. त्यामुळे डोळ्यावर काकडीचे पातळसर काप ठेवावे.

सध्या कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय. प्रखर उन्हामुळे डोळ्यांना त्रास जाणवतो. डोळ्यांची आगआग होते. अशावेळी काय काळजी घ्यावी?

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

VIEW ALL

Read Next Story