आपली झोप पूर्ण नसेल तर इतर आजारांना सामोरे जावे लागते.
भारतीयांमध्ये झोपेचे विकार खूप सामान्य असून एका सर्वेक्षणानुसार 93 टक्के भारतीयांना झोपेचे विकार असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
असे अनेक लोक आहेत ज्यांना रात्री झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. पण काही लोकांच्या अशाच काहीशा चुका असतात त्यामुळे रात्रीची पुरेशी झोप पूर्ण होत नाही.
झोपेसाठी अल्कोहोलचे सेवन करणे खूप धोकादायक ठरु शकते. रात्रीच्या वेळी अल्कोहोलचे सेवन करु नका.
चहा-कॉफी व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी शरीरातील कॅफीनची पातळी वाढवण्यासाठी जबाबदार असतात. कॅफिन तुमच्या मज्जातंतूंना उत्तेजित करते. याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवर होऊ शकतो.
रात्री हलके जेवण करा, पण याचा अर्थ असा नाही की आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करु नये. आहारातील फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.