केसांना आतून निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी पौष्टिकतेने भरपूर आहार घ्यावा. केसांच्या वाढीसाठी पोषक घटकांपैकी प्रथिने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
रोज एका अंड्याचे नियमित सेवन करा. अंड्यांमध्ये प्रोटीन आणि बायोटिन असते. हे केस वाढवण्याचे काम करते. केस लांब आणि दाट होण्यास मदत होते.
पालकामध्ये लोह, जीवनसत्त्वे आणि फोलेट असते. हे केस निरोगी ठेवण्याचे काम करते. याचे सेवन केल्याने डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते. केस लांब आणि दाट होण्यास मदत होते.
सोयाबीनचे सेवन केसांसाठी खूप चांगले असते. याच्या नियमित सेवनाने केस मजबूत आणि घट्ट होण्यास मदत होते. तुम्ही सोयाबीनचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यदायी देखील आहे.
सुका मेवा अनेक प्रकारच्या मिठाईंमध्ये वापरला जातो. त्यात ओमेगा-3 असते. तुम्ही आहारात अक्रोड, बदाम, चिया बिया, भोपळ्याच्या बिया आणि दुधीच्या बियांचा समावेश करू शकता. केस लांब आणि दाट होण्यास मदत होते.
एवोकॅडो केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव करण्याचे काम करते. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे केस मुळापासून मजबूत आणि घट्ट होतात.
कडधान्य हे संपूर्ण धान्य मानले जात असून, ते केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बायोटिन, लोह, झिंक आणि व्हिटॅमिन बी असते. त्यामुळे केस मजबूत होतात.
पालक मध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन उपलब्ध असतात. आपले केस मजबूत बनवण्यासाठी आयरन महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या आहारामध्ये जर आपण नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश केला तर आपल्या केसांची मुळे मजबूत बनतात.
लिंबू ,संत्री यामध्ये विटामिन सी ची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते. आपल्या शरीरातील लोहाचे शोषण करण्यासाठी विटामिन सी ची आवश्यकता असते. त्याचबरोबर नेहमी लिंबू पासून बनवले गेलेल्या पदार्थांचा समावेश आहारात आवर्जून करायला पाहिजे.
केसांना बाहेरूनच नव्हे तर आतूनही निरोगी बनवण्यासाठी ओट्स हा उत्तम घटक असू शकतो. अनेक महिला त्याचा हेअर मास्क केसांवर लावतात. त्याचा आहारात समावेश केल्यास केसांना आतून मजबूत बनवता येते.