बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे झपाट्याने वजन वाढण्याची समस्या दिसून येत आहे. संतुलित आहार न घेणे आणि व्यायाम न करण्याच्या सवयीमुळे अनेक आजार आपल्याला गाठतात.
वजन कमी करण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे योगा. जर तुम्हाला सुद्घा तुमचं वजन कमी करायचं आहे तर हे योगासन ठरतील फायदेशीर
पोटाची चरबी कमी करण्यासाठी या योगासनाचा उपयोग होतो. भुजंगासनामध्ये पोट जमिनीला टेकवणे, त्यामुळे प्रथम जमिनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. हाताचे पंजे छातीजवळ आणा आणि फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.
या योगासनामुळे मेटाबॉलिजममध्ये सुधारणा होते. पाय गुडघ्यात मोडा आणि दोन्ही हातांनी पायांची बोटं पकडा त्यानंतर जितके शक्य आहे तितके पाय एकमेकांजवळ ओढा नंतर दोन्ही गुडघे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा.
हे योगासन पचनशक्ती तसंच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतं. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही पायातील अंतर कमी ठेऊन खाली पायावर बसा दोन्ही हाताच्या कोपरे 90 अंशमध्ये सरळ ठेवा आणि उभे करा.
या आसनामुळे वजन कमी होण्यासोबतच कंबर दुखीसाठी देखील आराम मिळतो. सर्वात पहिले योग मॅटवर पद्मासनमध्ये बसा. दोन्ही हात तुमच्या गुडघ्यावर ठेवा. त्यानंतर दीर्घ श्वास घेत पोट आत घ्या आणि छाती वर करा. तुमची हनुवटी गळ्याला लावण्याचा प्रयत्न करा. या आसनावेळी पाठ ताठ ठेवा आणि श्वास रोखून धरा. काही क्षण अशाच स्थितीत राहा.
वजन कमी करण्यासोबत श्वसनक्रिया उत्तम करण्यासाठी याचा उपयोग होतो. हे आसन करताना दोन्ही हात समोर गुढघ्यावर ठेवा. कंबर सरळ ठेवा आणि डोळे बंद ठेवा. आता दीर्घ श्वास घ्या आणि तोंड बंद करुन नाकाने श्वास सोडा .