घोरणे थांबवण्यासाठी प्या 'हे' घरगुती पेय, होईल मोठी मदत

Jun 03,2024


अनेक लोकांना झोपल्यानंतर घोरण्याची सवय असते. आपल्या घोरण्यामुळे इतरांनाही त्रास होतो. लग्न समारंभात किंवा घरात पाहुणे आल्यावर घोरण्यामुळे आपल्याला अपमानस्पद वाटतं.


अशावेळी घोरणे थांबवण्यासाठी घरगुती पेय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. तज्ज्ञांनुसार हळदयुक्त खास पेयमुळे तुम्हाला घोरण्याच्या समस्येतून मुक्तता मिळू शकते.


एक चमचा हळद, किसलेले आले, दालचिनी पावडर, एक ग्लास दूध, एक चमचा मध आणि चिमूटभर काळी मिरी पावडर घ्या.


आता एक ग्लास दूध मध्यम आचेवर उकळा. आता यात एक चमचा हळद, किसलेले आले, दालचिनी पावडर, आणि चिमूटभर काळी मिरी मिक्स करा.


आता हे दूध चांगल्या प्रकारे उकळून घ्या. आता हे दूध गाळून घ्या. या पेयामध्ये तुम्ही मधही घालू शकता.


रात्री झोपण्याचा एक तासापूर्वी हे पेय प्या. हळद ही त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी उत्तम औषधं मानलं जातं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story