मानवी शरीरात कोलेस्टेरॉल ही अशी एक गोष्ट आहे जे वाढल्याने शारीरिक कार्यात अडथळे निर्माण होऊ लागतात.
चुकीची आहारपद्धती, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, ताणतणाव, धूम्रपान यांच्यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या वाढताना दिसते.
थंडीच्या दिवसात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. जाणून घेऊया हा उपाय.
थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर प्रमाणात आवळे उपलब्ध असून या आवळ्यांचा 10 मिलीलीटर ज्यूस घ्यायचा.
यामध्ये 2.5 मिलीलीटर आल्याचा रस करुन तो त्यामध्ये मिसळायचा.
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे मिश्रण प्यायचं आहे. या मिश्रणाने शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी होण्यात मदत होते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)