कांद्याच्या बिया आणि ऑलिव्ह ऑइल एकत्रित घेऊन पेस्ट तयार करा. आंघोळ करण्यापूर्वी तासाभर आधी केसांमध्ये हे मिश्रण लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करा. महिन्याभरात तुम्हाला केसांमध्ये सकारात्मक बदल अनुभवण्यास मिळतील.
नारळाचे तेल (पाच चमचे) एखाद्या लोखंडी भांड्यामध्ये गरम करा. यामध्ये दोन चमचे आवळ्याची पावडर मिक्स करा. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा व तेल थंड होण्यास ठेवून द्या. हे मिश्रण मुळांसह संपूर्ण केसांवर लावा. हलक्या हाताने केसांचा मसाज करा.
आपल्या आहारात उपयुक्त असणारा कडिपत्ता केस काळे होण्यासाठीही उपयुक्त असतो. कडिपत्त्याची पेस्ट करुन त्यामध्ये खोबरेल तेल घालून हे मिश्रण केसांना लावावे. केसांच्या मूळांना हे मिश्रण लावल्यास पांढरे केस येणे मूळातूनच कमी होते.
अकाली केस पांढरे होत असल्याची समस्या सतावत असेल तर एका वाटीत ताक घ्या. त्यामध्ये कडिपत्त्याच्या पानांचा रस घाला. हे मिश्रण थोडे घट्ट होण्यासाठी यामध्ये थोडे दही घाला. हे मिश्रण केसांना लावून चांगल्या पद्धतीने मसाज केल्यास केसांचा रंग बदलण्यास मदत होते. अर्धा तास हे मिश्रण लावून ठेऊन नंतर केस धुवून टाका.
केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकून रहावा यासाठी आवळ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आवळ्याचा रस आणि बदाम तेल एकत्र करुन त्याने केसांना मसाज केल्यास त्याचा केसांचा पोत सुधारण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो.
कांद्याची बारीक पेस्ट करुन त्यामध्ये लिंबाचा रस घाला. केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येवर याचा चांगला उपयोग होतो. ही घट्ट पेस्ट केसांच्या मूळांना आणि पांढऱ्या केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. यामुळे पांढरेपणा कमी होण्यास मदत होईल.