काही लोकांना बुरशीजन्य संसर्ग होण्याती शक्यता अधिक असते.यामध्ये मधुमेहाचे रुग्ण, कमी प्रतिकीरशक्ती आणि जे लोक हात आणि पायांची काळजी घेत नाहीत अशा लोकांचा समावेश होतो.
आपण आपले केस आणि चेहऱ्याकडे जसे लक्ष देतो त्याचप्रमाणे हात आणि पायांच्या नखांची देखील काळजी घ्यायला हवी.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते नखांवर पिवळेपणा आणि खडबडीतपणा हे नेल फंगसचे लक्षण आहे. ज्यामध्ये नखाच्या टोकाखाली पांढरे किंवा पिवळे डाग तयार होतात आणि नखांचा रंग फिका पडू लागतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही समस्या काहीवेळा वयाबरोबर उद्भवते. वयाबरोबर नखे तुटणे आणि कोरडे होतात. अशावेळी नखांना भेगा पडल्याने बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
त्याचबरोबर रक्ताभिसरण कमी झाल्याने देखील बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
काही वेळेस पाय आणि नखांमध्ये घाण साचल्यानेसुद्धा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
यासंसर्गापासून वाचण्यासाठी नियमित हात पाय स्वच्छ धुवा, जुने शुज वापरणं शक्यतो टाळा, नेलपॉलिश आणि कृत्रिम नखांचा वापर कमी करा.