शरीरासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घेणं महत्वाचं आहे. शरीरातील पचनसंस्थेचे कार्य अन्नाचे योग्य पचन करणे हे आहे.
पचनक्रियेतील अडथळ्यामुळे तुमचे शरीर अन्नाचे पचन नीट करू शकत नाही.
बरेचदा असं होतं की, जेवताना पोटात जडपणा जाणवू लागतो. यावेळी खाल्ल्यानंतर बराच वेळ जड वाटतं
जेव्हा तुमची पचनसंस्था कमजोर असते तेव्हा अन्नाचे पचन नीट होत नाही. यावेळी तर पोटाच्या वरच्या भागात जळजळ होण्याची समस्या होते.
छाती आणि नाभीच्या मधल्या भागात जळजळ आणि अस्वस्थता हे देखील शरीरातील खराब पचनाचे लक्षण आहे.
पोटात जळजळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ल तयार होणं.