कमी वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

Saurabh Talekar
Jan 19,2024

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

इंदूर येथील 18 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा कोचिंग क्लासमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सध्या सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

कारणं काय?

किशोरवयीन मुलांना हृदयविकाराच्या झटका का येतो? याची नेमकी कारणं काय आहेत? जाणून घेऊया...

अनुवांशिक

किशोरवयीन गटातील हृदयविकाराचा झटका हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीमुळे येऊ शकतो. हा एक दुर्मिळ अनुवांशिक विकार असतो.

लक्षणं कोणती?

अचानक छातीत दुखणं, हृदयाची लय बिघडणं, प्रचंड थकवा येणं, बेशुद्ध होणं, अस्वस्थता जाणवणं, इत्यादी लक्षणं दिसून येतात.

ऑक्सिजन

धमन्यांमध्ये फॅट्स जमा झाल्यास लहान वयातच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने हार्ट अटॅक येतो.

शारीरिक हालचाली

हृदयावर ताण येत असेल किंवा तीव्र शारीरिक हालचालींमुळे अनेकदा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

विश्रांती

कमी वयात फिट रहायचं असेल तर योग्य खाणं, काम करताना मानसिक विश्रांती घेणं आणि पुरेशी झोप आणि व्यायाम करणं आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story