रोजच्या जेवणात प्रामुख्याने चपात्या खाल्ल्या जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी जेवणाच्या ताटातून चपात्या हद्दपार केल्या आहेत.
निरोगी जीवनशैलीसाठी अनेकांनी आता गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारी-बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीचा पर्याय निवडला आहे. चपातीपेक्षी बाजरीच्या पिठाचे शरीराला अधिक फायदे होतात. बाजरीच्या पीठाचे शरीराला होणारे फायदे जाणून घेऊया.
बाजरीच्या पीठात प्रोटीन असतात ज्यामुळं स्नायू बळकट होतात त्याचबरोबर रक्तवाहिन्यांनाही फायदा होतो.
बाजरीची भाकरीत फायबर असताता त्याचा फायदा पचन क्रियेलाही होता. पोट स्वच्छ ठेवण्यापासून शरीराची उत्सर्जन प्रक्रिया सुरळीत सुरु ठेवण्यासाठी या घटकाची मदत होते
ज्यांनी शरीरासाठी ग्लुटन फ्री होण्याचा अर्थात ग्लुटन नसणारे पदार्थ खाण्याचा मार्ग निवडला आहे त्यांच्यासाठी बाजरी सर्वोत्तम पर्याय.
बाजरीमुळं रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहतं. तसंच, मॅग्नेशियमचं प्रमाण असल्यामुळं मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे
बाजरीमध्ये तंतूमय घटक जास्त असल्यामुळे याचा फायदा शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी होतो. यामुळं रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
अॅसिडीटी अर्थात अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी आवर्जून बाजरीच्याच भाकऱ्या खाव्यात. यामुळं त्यांच्या अपचनाच्या तक्रारी दूर होतील
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)