विड्याचे पान उष्ण असल्यामुळे वात आणि कफ विकारांसाठी फायदेशीर आहे.
घशामध्ये कफ साठून आवाज खरखरतो किंवा बसतो. अशावेळी ज्येष्ठमध पावडर, कंकोळ, मिरी, कात घातलेले विड्याची पाने चावून खाल्ल्याने फायदा होतो.
डोके जड होणे, दुखणे, सतत शिंका येऊन सारखे नाक गळत असेल विड्याची दोन पाने, चहाची पाती, धणे, आले, मिरी यांचा काढा तुम्हाला मदतगार ठरेल.
विड्याच्या पानामध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तुम्ही पान खाल्ल्याने पिंपल्सची समस्या होत नाही.
तुम्हाला भूक लागत नसेल तर विड्याच्या पानात मिरेपुड टाकून खाल्ल्यास फायदेशीर ठरेल.
मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास होत असल्यास विड्याचं पान खाल्ल्याने दिलासा मिळेल. त्याशिवाय विड्याच्या पानांचा रस करून तो डोक्यावर चोळल्यामुळे तुम्हाला फायदा होतो.
मधुमेह असणाऱ्यांसाठी देखील विड्याचं पान नियमितपणे खाणं मदतगार सिद्ध होईल. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरेल.
ॲसिडीटी, अपचन असा त्रास होत असल्यास विड्याचं पान खाल्ल्यामुळे पचनशक्ती सुधारते.
दातांचे आरोग्य राखण्यासाठी तसंच हिरड्यांच्या मजबुतीसाठी विड्याचं पान खावे.
निद्रानाशाचा त्रास होत असल्यास दररोज रात्री विड्याचं पान मीठ आणि ओवा घालून खाल्ल्यास फायदा होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)