पाऊस खरंच आनंद देतो? मानसिक आरोग्याशी संबंधित हे गुपित डोकं चक्रावेल
Rain Affetcs Mental Health : काही संशोधनांनुसार पावसाळी दिवसांमध्ये सर्वांनाच निरुत्साही वाटतं असं नाही. पण, ज्यांचं मुळातच पावसाळी जुळत नाही ती मंडळी या दिवसांमध्ये कमीत कमी आनंदी आणि रागीट असतात. अमेरिकेच्या एका मानसशास्त्र संस्थेनं याबाबतचं निरीक्षण नोंदवलं आहे.
तुमच्या मनस्थितीवर परिणाम करण्यास वातावरणातील अनेक घटक कारणीभूत ठरतात. पण, संशोधकांच्या मते लख्ख सूर्यप्रकाशाचा अभाव यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं.
जिथं कमीत कमी सूर्यप्रकाश असतो तिथं तुम्ही भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या काही बदल अनुभवू लागता. यामागचं कारण म्हणजे सूर्यप्रकाश आणि तुमच्या शरीराचं असणारं थेट नातं.
सूर्यप्रकाशाची कमतरता जाणवू लागल्यास नियमित निद्राचक्र विस्कळीत होतं. परिणामी तुमच्या घोरण्याचं प्रमाण वाढतं आणि याचे थेट परिणाम तुमच्या मनस्थितीवर होतात.
लख्ख सूर्यप्रकाशामुळं शरीरात डोपामाईन आणि सेरोटोनीन या दोन प्रकारच्या रसायनांना वाव मिळतो आणि तुम्ही उत्साही असता. पण, पावसाळी दिवसांमध्ये मात्र बेत रद्द करणं, एकाकी राहणं या अशा गोष्टींना तुम्ही प्राधान्य देता.
कोणतीही शारीरिक कसरत नाही, कोणाशी भेटीगाठी किंवा बोलणंचालणं नाही याच क्रियेत दिर्घकाळ राहिल्यास तुम्हाला त्याची सवय होऊ तुमचा इतरांशी असणारा संपर्कही तुटू शकतो.
पाऊस आवडणं किंवा न आवडणं हा सर्वतोपरी वैयक्तिक निर्णय किंवा प्राधान्यक्रमाचा विषय आहे. हो, पण त्याचं मनाशी असणारं नातं मात्र संशोधकांनाची चक्रावणारं आहे.
तुम्हीही पावसाच्या दिवसात काहीसे एकाकीच राहता का? एक लक्षात घ्या हे पावसाचे ढग दूर जाताच तुम्हाला पुन्हा उत्साही वाटेल. त्यामुळं तुम्ही आजारी नाही आहात. (सर्व छायाचित्रे- फ्रिपिक)