जन्मानंतर लगेचच बाळाला घराबाहेर नेल्यामुळे काही धोकादायक गोष्टी घडू शकतात. त्या काय आहेत ते जाणून घेऊया.
बाळाला गर्दीच्या ठिकाणी न नेण्याचा सल्ला आपल्याला घरातील मोठे नेहमीच देतात. त्याचं कारण म्हणजे बाळ लगेच आजारी पडू शकतं किंवा त्याला संसर्ग होऊ शकतो.
बाळाला बाहेर घेऊन जायचं असेल तर ऋतुनुसार त्याला कपडे परिधान करा. त्यामुळे वातावरणापासून त्यांचे संरक्षण होऊ शकते.
जन्माला आलेल्या बाळाला घरात आजारी असलेल्या लोकांपासून लांब ठेवा. बाळाची इम्यूनिटी खूप कमी असते त्यामुळे ते लवकर आजारी पडू शकतात.
नवजात मुलांना गर्दीत राहण्याची सवय नसते आणि त्यामुळे अचानक खूप लोकांना पाहून त्यांना भीती वाटू शकते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मुलांना सांभळणं कठीण होऊ शकतं.
नवजात मुलांची रोगप्रतिकार शक्ती आपल्यासारखी नसते त्यामुळे ते लगेच आजारी पडू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना अचानक बाहेर नेल्यास त्यांना इन्फेक्शन होऊ शकते किंवा ते आजारी पडू शकतात.
नवजात मुलं हे संवेदनात्मक असतात. त्यांना जास्त उजेड, प्रदूषणाची सवय नसते. त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. इतकंच नाही तर त्यांच्या आरोग्यावर किंवा विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
बाळाला सुरुवातील थोडा वेळ बाहेर घेऊन जा. त्यानंतर हळू हळू वेळ वाढवा. अचानक बाळाला पहिल्याच वेळी खूप वेळ बाहेर राहू देऊ नका.
(All Photo Credit : Freepik) (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)