या सर्व समस्या आणि त्यांची व्याप्ती पाहिल्यास धावपळीच्या आयुष्यात योग्य आराम आणि झोपही तेवढीच महत्त्वाचे असते हे अधोरेखित होते.
कमी झोप घेणाऱ्यांना मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. डिप्रेशनची समस्येला यामुळे तोंड द्यावं लागू शकतं.
स्थूलता ही सध्या जागतिक समस्या आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास शरीराचं वजन वाढू शकतं.
झोप कमी असेल तर शरीरामधील साखरेचं संतुलन बिघडतं. यामुळे मधुमेहाचा म्हणजेच डायबिटीजचा त्रास होऊ शकतो.
अचानक आकडी येण्याची समस्याही सातत्याने कमी झोप घेणाऱ्यांमध्ये उद्भवू शकते.
किमान कालावधीसाठी आवश्यक झोप मिळत नसेल तर रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. कमी झोपेची सवय लागल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होतो असं सांगितलं जातं.
शरीराचा फिल्टर अशी ओळख असलेल्या किडनीबद्दलच्या समस्यांचाही झोपेशी थेट संबंध असतो. पुरेशी झोप होत नसेल तर भविष्यात किडनीसंदर्भातील आजार होऊ शकतात.
योग्य प्रमाणात झोप न मिळाल्यास हृदयासंदर्भातील समस्यांचा त्रास होऊ शकतो. झोपेच्या वेळेस हृदयाची गती मंदावते. म्हणजेच या कालावधीमध्ये हृदयालाही आराम मिळतो असं म्हणता येईल.
आपल्या आधुनिक लाइफस्टाइलमुळे आपण झोपेला कमी महत्त्व देतो. मात्र झोपेकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्या कोणत्या हे पाहूयात...
झोप, झोपेसंदर्भातील समस्या आणि त्याबद्दलच्या जागृतीसाठी हा दिवस पाळला जातो.
आज वर्ल्ड स्लीप डे. दरवर्षी 15 मार्चच्या आसपास येणाऱ्या शुक्रवारी हा दिवस साजरा केला जातो.