बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारतरत्न हा भारतातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार आहे. मात्र हा पुरस्कार एका पाकिस्तानी व्यक्तीलाही मिळाला आहे.
आता भारतरत्न मिळवणारी पाकिस्तानी व्यक्ती कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचबद्दल जाणून घेऊयात...
2 वेळा भारतरत्न परदेशी व्यक्तींना देण्यात आला आहे. यापैकी एक नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला.
नेल्सन मंडेला यांना 1990 साली भारतातील हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नोबेल पुरस्कार विजेत्या मंडेला यांनी वर्णभेदाविरुद्ध आयुष्यभर लढाई दिली. त्यांना दक्षिण आफ्रिकेचे गांधी असंही म्हटलं जायचं.
याशिवाय भारतीय नसताना भारतरत्न पुरस्कार पटकावणारी पहिली व्यक्ती ही पाकिस्तानी आहे.
या व्यक्तीचं नाव आहे अब्दुल गफ्फार खान. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठीच्या लढ्यात अब्दुल गफ्फार खान यांनी मोलाची भूमिका बाजवलेली.
अब्दुल गफ्फार खान हे महात्मा गांधींच्या विचारांचे अनुयायी होते. त्यांनी प्रतिकार चळवळीच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलं.
अब्दुल गफ्फार खान यांना याच योगदानासाठी 1987 साली भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.