भारतातील 5 सर्वात प्रेक्षणीय स्थळे एकदा तरी इथे जायलाच हवं

Jun 05,2024

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स: उत्तराखंड

प्रत्येकाला उत्तराखंडच्या सौंदर्य माहितच आहे .त्यापैकी एक अद्वितीय ठिकाण आहे म्हणजे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. नावाप्रमाणेच,हे निसर्गाचे दृश्य आहे जिथे फुले इतकी सुंदर फुलतात की मन मंत्रमुग्ध होते. येथे तुम्हाला 600 हून अधिक प्रकारची फुलं पाहायला मिळतील.

सुंदरबन खारफुटी जंगल : पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालचा नैसर्गिक खजिना असलेले सुंदरबन खारफुटी जंगलासोबत येथील आदिवासी समाज निसर्गाशी जोडला गेला आहे तर त्यांच्या बरोबरच वाघ आणि अद्वितीय प्राणी यांचे घर बनले आहे. येथील खाऱ्या पाण्याची ही झाडे नैसर्गिक भिंती बनून किनाऱ्यांचे संरक्षण करतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना बोटीतून जंगलाचे सौंदर्य पाहता येते. तसेच, तुम्ही येथे राहणाऱ्या मच्छिमारांच्या गावांना भेट देऊ शकता आणि त्यांची जीवनशैली जाणून घेऊ शकता.

लिव्हिंग रूट ब्रिजे : मेघालय

हा ब्रिज मेघालयच्या चित्तथरारक नैसर्गिक दृश्यांसाठी ओळखले जातो आणि आणखी एक गोष्ट आहे जी त्याला खरोखरच खास बनवते ते म्हणजे हा पूल शेकडो वर्षांआधी झाडांच्या मुळांनी कुशलतेने बांधला आहे.

लोकाटक तलाव : मणिपूर

लोकटक तलाव ईशान्य भारतील मणिपूर राज्याच्या सौंदर्यात वाढवतो. हा तलाव अनेक कारणांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. लोकतक तलाव हे नैसर्गिक सौंदर्याचा खजिना असण्यासोबतच मणिपूरच्या लोकांसाठी आणि पर्यावरणासाठीही मौल्यवान आहे.

कच्छचे रण: गुजरात

कच्छचे रण हे भारतातील गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात वसलेले जगातील सर्वात मोठे मीठाचे वाळवंट आहे. हे वाळवंट त्याच्या विशालतेमुळे, ऋतूबदल आणि विशेष संस्कृती यासाठी ओळखले जाते. पावसाळ्यानंतरचा काळ, म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानचा काळ रणला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते जे त्याचे सौंदर्य वाढवते.

VIEW ALL

Read Next Story