मुलांसोबत आजी-आजोबा असले की त्यांना लहान वयातच दुनियेची ओळख होण्यास मदत होते.
आजी आजोबा हे लहान मुलांना मोठ्याचा आदर कसा राखायचा हे शिकवतात. त्यानं आपल्या परंपरा आणि नाती शिकवतात.
आजी आजोबांसोबत राहिल्यानं लहान मुलं ही कधीच कंटाळा करत नाहीत.
आजच्या युगात सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे लहान मुलांचे स्क्रीम अॅडिक्शन. परंतु यामुळे मात्र ते शक्य होतं. आजी आजोबांच्यासोबत खेळ्यात रमल्यानं ती स्क्रीनला विसरून जातात.
आजी आजोबांसोबत टीनेएज मधील आणि तरूण वयातील मुलं ही आपल्या अडचणी आणि प्रोब्लेम्सही शेअर करू शकतात.
आणि हो, चित्रपटात आणि मालिकांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे आजी आजोबा हे लहान मुलांना त्यांच्या कहाण्यांतून वेगळ्याच जगात घेऊन जातात.
आजी आणि आजोबा आजूबाजूला असल्यानं मुलांना पालकांची कमतरता वाटत नाही.
पिढीला घडवण्यात आजी आजोबांचा मोठा हातभार असतो. (ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)