वयाचा वाढता आकडा फारसा महत्त्वाचा नसतो असं म्हणतात, आणि केरळमधील मणी अम्मा हेच सिद्ध करून दाखवत आहेत. कारण, खुद्द आनंद महिंद्रासुद्धा आता त्यांचे चाहते आहेत.
वयाच्या ज्या टप्प्यावर वयोवृद्ध माणसं आरामाला प्राधान्य देतात त्या वयात या राधामणी अम्मा जेसीबी चालवत आहेत. x वरील पोस्टमध्ये महिंद्रा यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
जगण्याची आस आणि आपला ठसा मागं सोडण्यासाठीचे प्रयत्न.... शक्य त्या सर्व पॅडलवर पाय ठेवण्याची इच्छा... असं लिहित Age is just a number चीच आठवण महिंद्रा यांनी करून दिली.
मणी अम्मा भारतातील अशा पहिल्या महिला आहेत ज्यांच्याकडे 11 प्रकारचे वाहन परवाने अर्था लायसन्स आहेत. फक्त कारच नव्हे, तर त्यांच्याकडे ट्रक, जेसीबीचेही परवाने आहेत.
ड्रायविंग स्कूल चावणाऱ्या आपल्या पतीच्या स्मरणार्थ राधामणी अम्मा यांनी वाहन चालवण्यास सुरुवात केली. 1988 मध्ये त्यांना बस आणि ट्रकचा परवाना मिळाला होता.
केरळमध्ये अवजड वाहनांचा परवाना मिळवणाऱ्या मणी अम्मा पहिल्या महिला होत्या. रोड रोलर, फॉर्कलिफ्टही चालवण्याचा परवाना त्यांच्याकडे आहेत. काय मग, आहेत की नाही त्या 'सुपरवुमन'?