दसरा हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे.
हा सण रावणावर श्रीरामाचा विजय म्हणून साजरा केला जातो.
नवरात्रीच्या ९ दिवसांनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा होतो.
भारतातील अनेक राज्यांमध्ये तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
याशिवाय परदेशातही हा सण खूप लोकप्रिय आहे.
इंडोनेशियामध्ये सुद्धा लोक मोठ्या जल्लोषात हा सण साजरा करतात.
मलेशिया, थायलंडमध्ये देखील रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.
दसरा हा नेपाळमधील वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो.
श्रीलंकेत तमिळ-हिंदूंही दसरा साजरी करतात.
तर विशेष म्हणजे काही ठिकाणी रावणाची पूजा देखील केली जाते.