अंतराळामध्ये अनेक अॅस्टेरॉइड म्हणजे लघुग्रह उपस्थित असतात. यासंदर्भातील रिपोर्ट समोर आलाय. अनेकदा अॅस्टेरॉइड पृथ्वीच्या जवळून गेलाय.
पण अॅस्टेरॉइड पृथ्वीवर आदळलाय असं कधी घडलं नाहीय. पण असं घडलं तर काय होईलं? असा प्रश्न मनात येतो.
अॅस्टेरॉइड पृथ्वीवर आदळण्याचे दृश्य त्याचा आकार आणि गती यावर ठरु शकते. असे झाले तर अॅस्टेरॉइड आगीचा गोळा बनून वायुमंडळात प्रवेश करेल.
यामुळे जमिनित मोठे खड्डे पडू शकतात. काही घरे आणि इमारतींना नुकसान पोहोचू शकते.
अशी घटना घडल्यास भूकंप, त्सुनामी आणि आग पसरु शकते. स्थानिक पातळीवर खूप विध्वंस होऊ शकतो.
सध्याच्या घडीला वैज्ञानिक लघुग्रहांवर संशोधन करत आहेत. अॅस्टेरॉइडवर जगभरातील यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.
नासाकडे निअर अर्थ ऑब्जेक्ट वाइड फिल्ड इन्फ्रेड सर्व्हे एक्स्प्लोअर सारखे आंतराळ यान आहेत. जे लघुग्रह शोधतात.
वैज्ञानिक लघुग्रहांना निष्क्रिय करण्यासाठी किंवा पृथ्वीच्या कक्षेतून हटवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहेत.
पृथ्वीवर लघुग्रह आदळणे ही एक दुर्मिळ घटना आहे. AI च्या मदतीने वेबस्टोरीमध्ये ती काल्पनिकरित्या दाखवण्यात आली आहे.