अनेकांना कारमध्ये प्रवास करताना उलटी होते. त्यामुळे प्रवास करताना त्यांना भीती वाटते.
त्यामुळे आपण याबद्दल काही टिप्स जाणून घेऊया.
गाडीतील प्रवासाच्या 1 ते 2 तास आधी मोशन सिकनेसच्या गोळ्या घ्या. या गोळ्या घेण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गाडीतील अशी जागा निवडा जिथे मोशन सिकनेस होणार नाही. शक्यता गाडीच्या पुढच्या बाजूस बसा.
शक्यतो ताजी हवा घ्या. गाडीची विंडो उघडा. यामुळे गाडीत बाहेरची हवा येत राहील.
गाडी चालत असताना काही वाचू नका. दूर क्षितीजावर पाहण्याचा प्रयत्न करा.
एकाचवेळी पूर्ण प्रवास करु नका. प्रवासादरम्यान थोडा थोडा ब्रेक घेत चला.
प्रवासाठी पचनाला जड अन्न खाऊ नका. साधे जेवण जेवा. चिकन, मसालेदार पदार्थ खाऊ नका.
काळी मिरी किंवा लवंग चघळा. यामुळे उलटी येण्याच्या स्थितीपासून आराम मिळतो.