अयोध्या में सुरक्षा के इंतजाम काफी पुख्ता किए गए हैं. यहां पुलिस तो पहले से ही तैनात है, लेकिन अब एटीएस कमांडो भी तैनात कर दिए गए हैं.

Jan 19,2024


उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येते 22 जानेवारीला रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होणार आहेत.


पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येला एटीएस कमांडोचं जाळं पसरवण्यात आलंय.


उत्तर प्रदेश सरकारने 2007 मध्ये अँटी-टेरर स्क्वॉ़डची स्थापना केली होती. राज्यात दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी हे पथक काम करतं.


एटीएस कमांडोंना तीन परीक्षा द्याव लागतात. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या जवानांना ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं.


ट्रेनिंगमध्ये जवानांना अत्याधुनिक शस्त्र चालवणं, टार्गेट शुटिंग, शस्त्र नसताना लढणं, मार्शल आर्ट्ससारख्या बचाव आणि शत्रूवर आक्रमण करण्याची प्रशिक्षण दिलं जातं.


एटीएस कमांडोंची निवड करण्यासाटी सरकारकडून पोलीस आणि पीएसी जवानांना प्राधान्य दिलं जातं.


एटीएस कमांडोंशिवाय अयोध्येत 360 डिग्री सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. आर्टिफिशिल इंटेलिजेंस आधारीत अँटी माइन ड्रोनची नजरची नजर असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story