2016 मध्ये असेच लग्न झालं होतं. या लग्नात मात्र काहीतरी विशेष होतं. या लग्नात नवरीने घातलेला लेहेंगा कोट्यावधींचा होती. तर आमंत्रणासाठी एलसीडीची लग्नपत्रिका वापरण्यात आली होती.
2016 मध्ये ब्राह्मणी रेड्डी आणि राजीव रेड्डी यांचा भव्यदिव्य लग्न सोहळा पार पडला होता. या लग्नाला 50 हजारांहून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली होती.
या लग्नाच्या आमंत्रणासाठी एलसीडी लग्नपत्रिका वापरण्यात आल्या होत्या. लग्नपत्रिकांवर एकूण 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता.
या लग्नात नवरदेव रथावर बसून तर नवरीमुलगी डोलीत बसून आली होती. एवढंच नव्हे तर यावेळी 100 वेगवेगळ्या प्रकारचे डान्सर त्यांच्या मागोमाग डान्स करत चालत होते.
या लग्नात ब्राह्मणी रेड्डीने तब्बल 90 कोटी रुपयांचे दागिने घातले होते. तर लग्नासाठी ब्राम्हणीने 17 कोटी रुपयांचा लेहेंगा घातला होता.
येथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांसाठी शाही थाळी तयार करण्यात आली होती, ज्यामध्ये 16 प्रकारच्या मिठाई होत्या. प्रत्येक थाळीवर 3000 रुपये खर्च करण्यात आले होते.
तसेच ब्राह्मणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला खास मुंबईहून बोलावण्यात आले होते. त्याव्यतिरिक्त 50 हून अधिक प्रसिद्ध मेकअप कलाकारांना इतर पाहुण्यांसाठी बोलवले होते, ज्यांच्यावर 30 लाखांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता.
हे अलिशान लग्न नोटबंदीच्या काळात झाल्यामुळे अनेकांनी माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.