घेवरी देवी यांचे वडील भंवरलाल यांचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे. पण बहिण, मुलगी आणि सुनेपेक्षा संसारात मोठी संपत्ती नाही.
घेवरी देवी यांच्या भावांनी जमिनीची कागदपत्रं कुटुंबाला सोपवली आहेत. तिन्ही भावांची एकुलती एक असणाऱ्या बहिणीच्या कुटुंबाला चांदीची नाणी देण्यात आली. तिन्ही भावांनी बहिणीला 500 रुपयांनी सजलेली ओढणी दिली.
राजस्थानमध्ये जेव्हा एखाद्याच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होतं तेव्हा मामा आपल्या बहिणीला जी मदत करतात त्याला 'मायरा' असं म्हटलं जातं.
घेवरी देवी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात वडील आणि भावांना इतका मोठा आहेर घेऊन येताना पाहिलं तर आश्चर्याचा धक्का बसला. संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. घेवरी देवी यांचे वडील सांगतात की, अनुष्का त्यांची एकुलती एक मुलगी आहे.
अनुष्काच्या लग्नात तिचे आजोबा भंवरलाल गरवा आपली तीन मुलं हरेंद्र, रामेश्वर आणि राजेंद्र यांच्यासोबत करोडो रुपयांचा आहेर घेऊन पोहोचले होते.
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील झाडेली गावातील घेवरी देवी आणि भंवरलाल पोटलिया यांची मुलगी अनुष्काचं 15 मार्च रोजी लग्न होतं.