केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी संसदेमध्ये देशाचा 2024-25 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये भारत मित्र देशांना किती निधी मदत अथवा व्याज म्हणून देणार आहे याचा आकडा जारी करण्यात आला.
यानुसार भारत श्रीलंकेला यंदाच्या आर्थिक वर्षात 245 कोटी रुपये निधी देणार आहे.
भारत सर्वाधिक निधी देणाऱ्या मित्र देशांच्या यादीत म्यानमार पाचव्या स्थानी असून यंदाच्या वर्षी या देशाला भारताकडून 250 कोटी रुपये दिले जातील.
मॉरिशिअलसलाही भारत मोठी मदत करणार आहे. भारत या छोट्याश्या देशाला 370 कोटी रुपयांची मदत करणार आहे.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी भारताबरोबरच्या वादामुळे चर्चेत असलेला मालदीव हा देश आहे. भारत मालदीवला 400 कोटी रुपये देणार आहे.
भारत सर्वाधिक निधी देणाऱ्या देशांच्या यादीत नेपाळ दुसऱ्या स्थानी आहे. या देशाला भारत 700 कोटींची मदत करणार आहे.
भारत सर्वाधिक आर्थिक मदत ज्या देशाला करणार आहे त्याला मदत म्हणून तब्बल 2 हजार 68 कोटी 56 लाखांची मदत दिली जाणार आहे.
भारत ज्या देशाला दोन हजार कोटींहून अधिक निधी देणार आहे त्या देशाचं नाव आहे भूटान!
या सहा देशांना भारताकडून दिली जाणारी एकूण रक्कम 4033 कोटींहून अधिक आहे.