मासे पालन करुन चांगली कमाई करता येऊ शकते. पण थंडीच्या दिवसात मासे पालन करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
थंडगार पाण्यात मासे लगेच आजारी पडतात. जास्त थंड पाण्यामुळे तलावातील पाण्याच्या ऑक्सिजनवर परिणाम पडतो.
थंडीत तापमान घटल्याने मासे प्रजननावर परिणाम पडतो. अशावेळी तलावाची काळजी घेणं आवश्यक आहे.
तलावाच्या पाण्याचे तापमान सामान्य राहीलं याची काळजी घ्या. यासाठी किनाऱ्यावर झाडं लावा किंवा प्लास्टिक शीडचा उपयोग करा.
थंडीत माशांची पचन क्रिया हळू असते. त्यामुळे त्यांना पचायला हलके आणि पौष्टीक अन्न द्या. त्यांच्या अन्नात प्रोटीनची मात्रादेखील प्रमाणात असावी.
तलावाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. पाण्यात जमा होणारी घाण, पाने वेळोवेळी बाहेर काढा.
तलावाच्या पाण्याची गुणवत्ता कायम ठेवा. यामुळे माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळेल.
तलावाच्या पाण्यावर बर्फ जमा होऊ देऊ नका.यासाठी एरिएटरचा उपयोग करा.
पाण्याच्या फिल्टरेशन यंत्रणेला अॅक्टिव्ह ठेवा. ट्यूबवेल किंवा पंपसेटने पाणी स्वच्छ ठेवा.
असे मासे पाळा जे वेगवेगळ्या तापमानातही जगू शकतील.