काही दिवसांमध्ये बारावीचा निकाल लागेल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांपैकी अनेकांना पुढे काय करायच माहिती नसतं.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पुढील 5 पर्याय स्वीकारतात. याबद्दल जाणून घेऊया.
बारावीनंतर 5 वर्षाचा MBBS कोर्स करु शकता. रुग्णांची सेवा करुन चांगले पद, प्रतिष्ठा आणि पगार मिळतो.
बारावी उत्तीर्ण झाल्यावर अनेकजण चार्टट अकाऊंटंटचा पर्याय निवडतात. यात स्थिर झाल्यावर तुम्ही चांगली कमाई करता.
बारावीनंत सायंटि्सट बनण्याकडे अनेकांचा कल असतो. पण असेल तर ही खूप मोठी प्रक्रिया आहे. यासाठी तुम्हाला धैर्य ठेवावे लागेल.
इंजिनीअर व्हायचे स्वप्न पाहत असाल तर बारावीनंतर आयआयटीमधील प्रवेशासाठी जेईई द्यावी लागते.
बारावीनंतर लॉ ला प्रवेश घेऊन तुम्हाला कायद्याचे ज्ञान आणि कौशल्य प्राप्त होईल.
कोणताही कोर्स करत असाल तर त्यात मेहनत, चिकाटी, सातत्य असणे आवश्यक आहे.
हे गुण असाल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करिअर केलात तरी यश मिळवाल.