CBSE बोर्डाचा मोठा बदल; अनेक वर्षांपासून सुरु असणारी 'ही' परंपरा कायमची केली बंद
Dec 01,2023
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने दहावी आणि बारावीच्या 2023-24 परीक्षेआधी एक महत्त्वाची अपडेट केली आहे.
बोर्डाने 2024 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षाच्या आधी आणखी एक जुनी परंपरा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीबीएसईने आता 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेत कोणत्याही विद्यार्थ्याला डिव्हिजन किंवा डिस्टिंशन न देण्याचा निर्णय घेतला आहे.
डिव्हिजन, डिस्टिंशन किंवा एकूण मार्क्स देणार नाही
सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितलं आहे की, बोर्ड दहावी आणि बारावीच्या मार्कशीटमध्ये डिव्हिजन, डिस्टिंशन किंवा सर्व विषयातील एकूण मार्क्स देणार नाही.
दहावी आणि बारावीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देणारी संस्था स्वत: विद्यार्थ्यांच्या गुणांची मोजणी करतील असं बोर्डाने सांगितलं आहे.
जर एखाद्या विद्यार्थ्याने पाचपेक्षा अधिक विषयांववर भर देत असेल तर संस्था फक्त बेस्ट 5 विषयांच्या गुणांची मोजणी करेल.
याआधी सीबीआयने अनहेल्दी स्पर्धा रोखण्यासाठी मेरिट लिस्ट जारी करण्याची परंपरा बंद केली होती.