2050 पर्यंत पाण्याखाली जाणार भारतातील 'हे' प्रमुख भाग?

Pravin Dabholkar
May 05,2024


संपूर्ण जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट घोंघावतंय.


आरएमएसआयच्या रिपोर्टनुसार 2050 पर्यंत, भारतातील 6 शहरांचा काही भाग समुद्राखाली बुडणार आहे.


मुंबईतील हाजीआली दर्गा, नेहरु पोर्ट ट्रस्ट, वेस्टन एक्सप्रेस हायवे,वांद्रे वरळी सी लिंक पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.


मुंबई, कोच्ची, मंगळूर, चेन्नई, विशाखापट्टणम सहित तिरुवअनंतपुरमचा काही भाग बुडू शकतो.


2050 पर्यंत मुंबईतील साधारण 998 इमारती आणि 24 किमी रस्ता वाढत्या जलस्तरामुळे प्रभावित होईल.


याच कारणामुळे 2050 पर्यंत चेन्नईत 55, कोच्चीमध्ये साधारण 464 इमारतींचं नुकसान होईल.


तिरुवअनंतपुरममध्ये 387 इमारती, विशाखापट्टणमध्ये साधारण 206 घरे आणि 9 किमीचा रस्ता बुडण्याची शक्यता आहे.


2050 पर्यंत भारताच्या चारही बाजुला समुद्राच्या पाण्याचा जलस्तर वाढण्याचा धोका आहे.


या सर्व घटनांमागे जलवायू परिवर्तन हे कारण आहे.

VIEW ALL

Read Next Story