कठीण परिस्थितीत कामी येतील अशा गोष्टी चाणाक्य नीतीमध्ये सांगितल्या गेल्या आहेत.
जो व्यक्ती यशस्वी होतो, त्याचे विरोधकही वाढतात. त्यांच्याशी लढता आलं पाहिजे.
विरोधकांचा सामना कसा करायचा? ही कला यायला हवी. याच्या टिप्स चाणाक्य नीतीतून घेता येतील.
सर्वात आधी मित्र कोण आणि शत्रू कोण? हे ओळखता यायला हवे.
विरोधकांसमोर तुमची कमजोरी सांगू नका. शक्य होईल तितकी ताकद दाखवा.
विरोधकाच्या पावलावर नजर ठेवा. वेळ आल्यावर त्याला आरसा दाखवा.
धैर्य ठेवा. घाईत कोणता निर्णय घेऊ नका. योग्य वेळ येण्याची वाट पाहा.
विरोधकांवर विजय मिळवण्यासाठी त्याची कमजोरी जाणून घ्या.
विरोधकाची कमजोरी समजल्यावर तुम्ही त्यावर सहज विजय मिळवू शकाल.