डाळिंब, बीट आणि टोमॅटोही रक्त वाढवण्यात मदत करतात. ही फळं कच्ची किंवा ज्यूस बनवत तुम्ही सेवन करु शकता.
तसंच अ जीवनसत्वही आयर्नसाठी फायदेशीर असतं. यासाठी गाजर, पपई, आंबा आणि अंजीर या फळांचं रोज सेवन करा.
शरिरात रक्त वाढवण्यासाठी ब जीवनसत्वही गरजेचं आहे. डाळी, वाटाणे, बिया, सोयाबीन, राजमा यामधून ब जीवनसत्व मिळतं.
शरीराला आयर्न देण्यासाठी विटॅमिन सी गरजेचं आहे. यासाठी लिंबू, संत्रं, किवी आणि अननस या फळांचं सेवन करा.
हिमोग्लोबिन कमी झाले असल्यास तुमच्या डाएटमध्ये ओट्स, तांदूळ, लापसी आणि स्प्राऊट्स यांचा समावेश करा.
हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी आयर्न असणाऱ्या भाज्यां म्हणजेच पालक, ब्रॉकली यांचं सेवन करा.
हे एका प्रकारचं प्रोटिन आहे, जे रेड ब्लड सेल्समध्ये आढळलं. हे शरिराला ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. त्यामुळे असा काही पदार्थांबद्दल जाणून घ्या जे तुमच्या शरिरातील रक्ताची कमतरता दूर करण्यात मदत करतील.
शरीरात फार काळ हिमोग्लोबिनची कमतरता असणं जीवघेणं ठरु शकतं. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास शरिरातील रक्ताचं प्रमाणही कमी होतं.