त्यांनी दूध, दही, पनीर भरपूर प्रमाणात खाल्लं पाहिजे. अशा पुरुषांना बदाम, काजू, अक्रोड यांचं सेवन केलं पाहिजे.
50 हून अधिक वयाच्या पुरुषांनी जेवणातून चपाती, भात कमी केलं पाहिजे. त्यांनी दुग्धजन्य पदार्थांवर जास्त भर देण्याची गरज आहे.
आहारात बर्गर, पिझ्झा, बिस्कीट, तळलेलं अन्न, फळांचे ज्यूस, मद्य यांच्यापासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. या गोष्टींमुळे वजन वाढू शकतं आणि आजारांचे धोके उद्भवू शकतात.
35 ते 50 वयोगटातील पुरुषांना पौष्टिक अन्नाची गरज असते, ज्यामध्ये फार कॅलरीज नसतात.
या वयोगटातील व्यक्तींना दर दिवशी 55 ते 60 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. तसंच त्यांनी सॉफ्ट ड्रिंक आणि मद्यपान यांचं जास्त सेवन करु नये.
19 ते 35 वयोगटातील तरुण, पुरुष मसल बिल्डिंगवर जोर देतात. यामुळे त्यांनी आहारात प्रोटीनचा समावेश केला पाहिजे.
तसंच सोयाबीन, मासे आणि अंडी यांचंही नियमितपणे सेवन केलं पाहिजे. तसंच आयर्न, कॅल्शिअम, विटॅमिन डी युक्त अन्न खाल्लं पाहिजे. याशिवाय निरोगी फॅट्स खाल्ले पाहिजेत.
19 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना जास्त ऊर्जेची गरज असते. यामुळे त्यांनी आहारात फळं, भाज्या, बटाटा, ब्रेड, तांदूळ यांचा सहभाग करणं गरजेचं आहे.
Diet for men: निरोगी आरोग्य हवं असेल तर प्रत्येकाने योग्य अन्नाचं सेवन करणं गरजेचं असतं. आपण काय खातोय यासह किती आणि कधी खातोय हेदेखील महत्त्वाचं असतं. तसंच यामध्ये आपलं वय काय आहे हा मुद्दाही महत्वाचा असतो.