पाणीपुरीच्या जन्मामागे एक मनोरंजक गोष्ट आहे.
महाभारतात जेव्हा नवविवाहित द्रौपदीने पहिल्यांदा तिच्या सासरी प्रवेश केला तेव्हाची ही गोष्ट.
त्यावेळी पांडवांच्या माता कुंतीनं तिचे पुत्र वनवासात असताना कमी साहित्यात द्रौपदी जेवण करू शकेल का याची परीक्षा घ्यायची होती.
कुंतीनं द्रौपदीला उरलेली बटाट्याची भाजी देत तिची परीक्षा घेण्याचं ठरवलं.
कुंतीनं पार्वतीला फक्त एक पुरी करता येईल इतकंच गव्हाचे पीठ दिले.
आपल्या तिच्या 5 मुलांची भूक भागेल असे अन्न बनवण्याची सूचना तिनं द्रौपदीला दिली.
असं म्हणतात हा तोच क्षण होता जेव्हा सर्वप्रथम पाणीपुरीचा जन्म झाला.
असे मानले जाते की जेव्हा द्रौपदी पाणीपुरी घेऊन आली तेव्हा कुंती प्रभावित झाली.
असं म्हटलं जातं की कुंतीनंच या पदार्थाला अमरत्वाचा आशीर्वाद दिला.
हाच पदार्थ पुढे जाऊन पाणीपुरी म्हणून प्रचलित झाला.
आज गोल गप्पे, गुप चूप, पानी के पत्ते, फुलकीस, पुचका आणि बरेच काही अशा अनेक नावांनी पाणीपुरी ओळखली जाते. (माहिती सौजन्य - The Better India)