हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन घातल्यास हलव्याची चव दुप्पट होईल.
पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषले जाणार नाही.
कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर कॅरमलाईज होईल आणि ग्रेव्हीला रंग आणि चव येईल.
भात शिजवताना त्यात 1 चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका, यामुळे तांदूळ फुलून पूर्णपणे पांढरा होईल.
गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाका म्हणजे आणखी चव छान येईल.
जुना किंवा शिळा ब्रेड बारीक चिरून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा वापर कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते.
भजीचे पीठ बनवण्यासाठी त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका, यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील.
दूध फाटल्यानंतर त्यातले पाणी फेकून देऊ नका. याउलट त्या पाण्याचा वापर तुम्ही चपाती किंवा पराठाचे कणीक मळताना करु शकतात. यामुळे चपाती-पराठे अधिक चवदार आणि मऊ होतील.