आपलं ज्याच्यावर प्रेम आहे अशा व्यक्तीसह लग्नाआधी एकत्र राहायला परवानगी. तसेच लग्नाआधी या ठिकाणी मेळा लागतो, ज्यामध्ये मुलं-मुली एकत्र जमतात.
या मेळ्यातून आपल्यासाठी जोडीदार निवडल्यानंतर मुलं आणि मुली लग्नाशिवाय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि आई-वडिलांची या गोष्टीला संमती असते
ही प्रथा फार जुनी असून या गावातील चार भावडांपैकी तिघांनी लग्न केले पण त्यांना मुलं झाली नाहीत. तर चौथ्या भावाने लिव इनचा पर्याय निवडला आणि त्याला मुलगे झाले.
गरासिया जमातीमधील या महिलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आधुनिक समाजातही मिळणार नाही इतके स्वातंत्र्य या महिलांना मिळते.
गारासिया जमाती स्वातंत्र्य आणि नातेसंबंधांमधील लवचिकता समजून घेण्याची पद्धत अनोखी
गारसिया जमातीमध्ये मुली-बालविवाहाच्या सुरुवातीच्या दबावापासून ते शिक्षण आणि संधींच्या असमान प्रवेशापर्यंत सर्व बंधनांना तोडून स्त्री-पुरुष समानतेची शिकवणूक देत एक आशा आणि बदल म्हणून पाहता येते.